कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज पासून जनसंघर्ष यात्रा काढली जात आहे. या  जनसंघर्ष यात्रेची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत  ही जनसंघर्ष यात्रा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनसंघर्ष यात्रेचा पहिला टप्पा कोल्हापूर त्यानंतर सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यात होणार आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने एक प्रकारे काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार सांगणार, असं म्हटलं जातंय.


आजच्या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात कोल्हापुरातील कावळा नाका येथून रॅली काढून केली जाणार आहे. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून काँग्रेसचे सर्व नेते महालक्ष्मी देवीचे दर्शन घेणार आहेत.


 महालक्ष्मी देवीच्या दर्शनानंतर कोल्हापुरातीलच केशवराव भोसले नाट्यगृहात जनसंघर्ष यात्रेची पहिली सभा होणार आहे.