जव्हार-डहाणू नगरपरिषद आणि नवापुर-तळोदा पालिकांचे निवडणूक निकाल सोमवारी
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. पालघर डहाणू-नगर परिषद निवडणुकीत ६८.२५ टक्के मतदान झालं आहे.
ठाणे : पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. पालघर डहाणू-नगर परिषद निवडणुकीत ६८.२५ टक्के मतदान झालं आहे.
सोमवारी निवडणुकांचे निकाल
सोमवारी जव्हार, डहाणू नगरपरिषदेसोबतच नंदुरबार, नवापुर आणि तळोदा पालिकांचे निकाल लागणार आहेत.
निकालांकडे सर्वांचे लक्ष
सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केलेल्या या दोन्ही नगरपरिषदेच्या निवडणुक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
डहाणूत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चुरस
डहाणू नगरपरिषदेत सध्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चुरस आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर २५ नगरसेवक जागांसाठी ११० उमेदवार रिंगणात आहेत. डहाणू नगर परिषदेत एकूण ३२ हजार मतदार आहेत.
जव्हारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत
जव्हार नगरपरिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या पक्षात खरी लढत असून नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत.
तर, १७ नगरसेवकांच्या जगासाठी ६६ उमेदवार उभे आहेत. जव्हार नगर परिषदेत ८ हजार मतदार आहेत.
नंदुरबार, नवापुर आणि तळोदा पालिकांचे निकाल
नंदुरबार, नवापुर आणि तळोदा पालिकांचे निकाल सोमवारी लागणार आहेत. या तिन्ही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपा अशी सरळ लढत होत असून सत्ता कुणाची येणार हे अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे.