मुंबई :  राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत (Governor appointed MLA) काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, आमदार नियुक्तीचा निर्णय येत्या १५ दिवसा घ्यावा, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन राज्यपालांना शालजोडीतले लगावले. राज्यपाल कोणाताही वाद निर्माण करणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.


तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत १५ दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ते रत्नागिरीत बोलत होते. महाविकास आघाडीने बारा जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस केली आहे. यावर राज्यपाल काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 


याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यादी नियमानुसार नसल्याचे सांगून फेटाळून लावली होती. त्यानंतर राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली होती.