Jaykumar Gore car accident : आमदार जयकुमार गोरे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातावेळी कारच्या एअरबॅग उघडल्याच नाहीत, अशी माहिती आता पुढे आली आहे. एअरबॅग न उघडल्याने कार चालक, अंगरक्षक गंभीर जखमी झालेत, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आमदार जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.


 गाडीचा चालक आणि गोरे यांचा अंगरक्षक गंभीर जखमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात ते सुदैवाने बचावले असले तरी गाडीचा चालक आणि गोरे यांचा अंगरक्षक गंभीर जखमी झालेत आहेत. ज्या गाडीतून हे सर्व जण प्रवास करत होते त्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, एवढा मोठा अपघात होवून देखील या वाहनाचा एअरबॅग घडल्या नाहीत, त्यामुळे गाडीतील लोकांना जास्त दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले आहे. ( हेही बातमी वाचा - भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला मोठा अपघात)



जयकुमार गोरे यांच्या गाडीला पुणे-पंढरपूर रस्त्यावरील मलठण येथील स्मशानभूमीजवळ अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडी 30 फूट खोल खड्डयात पडली. या दुर्घटनेत जयकुमार गोरेंसह चौघे जखमी झालेत. गोरेंवर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर इतर जखमींना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आले आहे. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. मंत्री चंद्रांत पाटील तसेच खासदार रणजीत सिंह निंबाळकर रुबी रुग्णालयात जाऊन गोरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे माणचे आमदार आहेत. विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरे यांनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले. 2009 मध्ये अपक्ष,  2014 मध्ये काँग्रेस तर 2019 च्या निवडणुकीत भाजपमधून विजयी होऊन गोरे यांनी यशाची हॅट्ट्रिक साधली. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करुन राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


नितीन गडकरींची मोठी घोषणा


उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी एअरबॅग्ज अघडल्या नव्हत्या. तसेच विनायक मेटे यांचा 14 ऑगस्ट रोजी अपघात झाला होता. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या या अपघातात विनायक मेटे यांना जबर मार बसून त्यांचा मृत्यू झाला होता. रस्ता अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या दोन मोठ्या अपघातानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. कारमधील प्रत्येकाला सिट बेल्ट बंधनकारक केला आहे. तसेच गाडीमध्ये मागिलबाजूसही एअरबॅग्ज लावण्याबाबत घोषणा केली.