Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली.  त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले. अजित पवार गटाला विलिन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाला नुकसान करणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार पार्टी अध्यक्षाला आहे. यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्यात आले आहेत. तुम्हाला कायदेशीर मान्यता नाही.


आमचे नेते शरद पवार आहेत, असे तिथे सर्वच म्हणत होते. आता नैतिकतेचा प्रश्न उभा राहतो. जर तुम्ही शरद पवारांना अधक्ष मानता तर त्यांनी केलेली कारवाई मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


एकजण म्हणत होते असा उल्लेख त्यांनी केला. ते एकजण म्हणजे शरद पवार आहेत. 


त्यांनी केलेल्या कोणत्याही नियुक्तीला मान्यता नाही. 'त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, की त्यांनी शरद पवारांकडे यावं आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगावं.', असे आव्हाड म्हणाले. 


तोंडाला काळ फासा किंवा काहीही करा, रक्तात फक्त शरद पवार आहेत. तत्वांपासून आम्ही लांब राहणार नाहीत आणि शरद पवारांना सोडणार नाहीत,असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.