जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला भाजपचा मेगाप्लॅन; राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे.
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आहे, लागलीच विधानसभा आणि त्यापूर्वी महापालिका निवडणुका होऊ शकतात. मात्र त्याचदरम्यान एका बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ माजवलीय. भाजप लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय.
उत्तरेतील तिन्ही राज्यात एकहाती सत्ता मिळाल्यामुळे भाजपला दहा हत्तींचं बळ आलंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान मोदी आणि भाजपचं नाणं खणखणीत वाजेल, असं जाणकारांना वाटतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही चेहरे कमळ चिन्हावर लढल्यास त्याचा फायदा होईल अशी चर्चा आहे.
देशात लोकसभा जागांच्या दृष्टीनं महाराष्ट्र नंबर दोनचं राज्य आहे. 2014 आणि 2019 ला महाराष्ट्रानं भाजपला भरभरुन जागा दिल्या, विजयाची हॅटट्रीक साध्य करण्यासाठी भाजपला एकेक जागा महत्त्वाची आहे, त्यामुळेच महाराष्ट्र भाजप 2024 साठी स्वबळाची रणनीती आखतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
लोकसभेच्या जागा वाटपावरून मविआत मतभेद होण्याची शक्यता
लोकसभेच्या जागा वाटपावरून मविआत मतभेद होण्याची शक्यताय...आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढवणार असून, याबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी तशी चर्चा झाल्याचं राऊतांनी म्हटलंय... तर राऊतांच्या या दाव्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टोला लगावलाय.. तसंच येत्या 15 दिवसात जागा वाटपासंदर्भात माहिती मिळेल असा दावाही सुळेंनी केलाय.
अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा
अजित पवारांनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय. इकडे तिकडे करु नका, ज्यांना माझ्यासोबत राहिचे आहे त्यांनी माझ्यासोबत राहा, अन्यथा तिकडे जा, आता फक्त माझं ऐकायचं, इतरांचं ऐकाचं नाही, असा दम दादांनी बारामतीतल्या कार्यकर्त्यांना दिलाय. त्याचवेळी आपण बारामतीतून लाखांच्या मताधिक्यांनी कसे निवडून येतो, त्याचीही उदाहरणं अजित पवारांनी दिली. शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी टोलेही लगावले.
मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंलर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील स्वच्छता करताना ठाकरेंवर निशाणा साधलाय...गेल्या अडीच वर्षात झालेला कचरा साफ करत असून, बीएमसीच्या तिजोरीवर काहींनी दरोडा टाकला...आता मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे दरोडेखोर आमच्यावर आरोप करतायत...त्यामुळे मुंबईत स्वच्छता करत असल्याच शिंदेंनी म्हटलंय..तर 2024 ला कोणती घाण साफ होतेय आणि कोण कच-याच्या डब्यात जातंय हे त्यांना कळेल...असं प्रत्युत्तर राऊतांनी शिंदेंना दिलंय.