Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्ताच्या केबिनमध्ये सापडले नोटांचे बंडल सापडल्याचा आरोप आव्हाड यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. सगळा जमा खर्च सांभाळणारे नोटा मोजत असल्याचा दावा देखील आव्हाड यांनी केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral video) होत आहे. 


धमकी प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातला वाद चांगलाच पेटला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धमकी प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आणि ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यातला वाद चांगलाच पेटलाय. अशातच जितेंद्र आव्हाडांनी महेश आहेरच्या केबिनचा एक व्हिडिओ ट्विट केलाय. ज्यात आहेर यांचा सहकारी म्हाडसे हा केबिनमध्ये पैसे मोजताना दिसून येतोय. म्हाडसे हा महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळतो असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. 


महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत असं कॅप्शन आव्हाडांनी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिमध्ये आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री  तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे सिटी पोलिस तसेच ठाणे महापालिकेला टॅग केले आहे. 


 



जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या महेश आहेर याला अटक


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या महेश आहेर नावाच्या व्यक्तीला आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर गाठून चोप दिला. महेश आहेर हा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यानं तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी आहेरला ताब्यात घेतलं. मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच पेटलंय. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


शिंदे गटाच्या पैशेवाल्या नेत्यांकडून खुलेआम एक कोटींची ऑफर


कळवा आणि मुंब्राच्या माजी नगरसेवकांना कोट्यवधींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शिंदे गटाच्या पैशेवाल्या नेत्यांकडून खुलेआम एक कोटींची ऑफर माजी नगरसेवकांना दिली जात असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी ट्विटद्वारे केला होता. पती आणि पत्नीला एक कोटी रुपये, महापालिका निवडणुकीचं तिकिट आणि 10 कोटींची कामं देण्याचं आमिष दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं काम सुरु असल्याचा दावा आव्हाड यांनी केला होता.