Jitendra Awhad Threatening : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन (Jitendra Awhad Threatening phone call) आलाय. बिष्णोई गँगने (Bishnoi Gang) फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे. रोहित गोदरा नावाच्या व्यक्तीने  जितेंद्र आव्हान यांना फोन केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पैशांची मागणी केली. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिष्णोई गँगचा असल्याची माहिती आहे. पैसे दिले नाही तर तयार राहा असा इशारा धमकी देणाऱ्याने दिल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. धमकीचा फोन ऑस्ट्रेलियावरुन आल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिष्णोई गँगच्या रडारवर राजकीय नेते
काही दिवासंपूर्वीच बिष्णोई गँगने अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना गुजरातमधून अटक केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बिष्णोई गँगने आमदार जितेद्र आव्हान यांना धमकीचा फोन केलाय. यामुळे बिष्णोई गँगच्या रडारवर महाराष्ट्रातील राजकीय नेते आहेत का अशी भीती व्यक्त केली जात आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत तर सलमानसारखं होईल असं म्हटल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार आहे. यानिमित्ताने बिष्णोई गँग महाराष्ट्रात सक्रिय होतेय का? असंही बोललं जात आहे. 


कोण आहे बिष्णोई?
लॉरेन्स बिष्णोई हा कुख्यात गँगस्टर (Gangstar) असून सध्या तो तिहार जेलमध्ये बंद आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर तो तुरुंगातून आपली गँग चालवतोय. तुरुंगाबाहेर ही गँग सध्या गोल्डी बराड आणि त्याचा भाऊ सचिन बिष्णोईचालवतायत. हे दोघंही सध्या कॅनडात लपलेत. याशिवाय ऑस्ट्रीयामधून अनमोल बिष्णोई आणि कॅनडातून विक्रम बराड आर्थिक देवाण-घेवाणाची कामं सांभाळतात. पोलिसांनी दिलेल्या बिष्णोई गँगमध्ये शार्फ शुटर्स, कॅरिअर, सप्लायर, रेकी करणारे, शेल्टर मॅन आणि सोशल मीडिया विंगचे तरुण मोठ्याप्रमाणावर सहभागी आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. 


सलमानला धमकी देण्याचं कारण
1998 मध्ये सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून बिश्नोई समाज सलमान खानच्या विरोधात आहेत. त्याच्या चित्रपटांवरही बहिष्कार घातला जातो, इतकंच काय तर त्याची गाणीही या समाजातील लोकं ऐकत नाहीत. हा समाज शांतीप्रिय मानला जात असल्याने त्यांनी सलमानविरुद्ध आजपर्यंत आवाज उठवला नव्हता. पण गुन्हेगारीच्या जगतात लॉरेन्स बिश्नोईचं नाव चर्चेत आलं आणि त्याने थेट सलमानलाच जीवे मारण्याची धमकी दिली.