बँकेमध्ये नोकरीची संधी, मिळतील ३५००० रुपये
या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१७ ला ठेवण्यात आली आहे.
अमरावती : जेपी अमरावती को-ऑपरेटिव्ह बँकेने शाखा व्यवस्थापक, सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपिक, वरिष्ठ टाइपरायटर, कनिष्ठ टाइपराइटर, शिपाई यांच्यासाठी अर्ज मागविले आहेत. ३६ जागांच्या भरतीसाठी बँकेने जाहिरात जारी केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१७ ला ठेवण्यात आली आहे.
पोस्ट
शाखा व्यवस्थापक - ०७ पोस्ट
सहाय्यक अधिकारी - ०८ पोस्ट
वरिष्ठ लिपिक - ०९ पोस्ट
वरिष्ठ टाइपराइटर - ०१ पोस्ट
कनिष्ठ टाइपराइटर - ०१ पोस्ट
शिपाई - १० पोस्ट
निवड प्रक्रिया- लेखी परिक्षा आणि मुलाखतीतील कामगिरी
अर्ज शुल्क- सामान्य उमेदवार ४०० रुपये एससी / एसटीसाठी २०० रुपये
पगार- ९३००-३४,८०० + ग्रेडपे ४,३०० (१ पोस्ट), रु. ५२००-२०२०० + ग्रेडपे ३०००/१९००/२४०० (पोस्ट २-५),४४४०-७४४० + ग्रेडपे १३०० (पोस्ट ६)
महत्त्वाची माहिती
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी, मान्यताप्राप्त संस्थेमार्फत १० वी १२ वी-बीटेक-डिप्लोमा-पीजी असणे आवश्यक आहे.
अर्जदार कमीतकमी १८ वयोगटातील आणि जास्तीत जास्त वय ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.
राखीव श्रेणी देण्यात आली आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना नागपूर (महाराष्ट्र) मध्ये नोकरी मिळेल.
अधिक माहितीसाठी http://zpshikshakbankamt.in ला भेट द्या.