नारायगावमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भितीचं वातावरणं
नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरणही पाहायला मिळतंय.
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ऊसाच्या शेतीत बिबट्याचं दर्शन नित्याचं झालंय. आता तर हे बिबटे महामार्गावरही सहजपणे पाहायला मिळतंय. सध्या नारायणगावमधील नारायणवाडी परिसरातून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर काही युवकांनी बिबट्यांच्या विविध हालचाली टिपल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
'बिबट्या पहायचाय..?
शिवाय या व्हिडिओला टॅग लाईन दिलीय ती पण लक्षवेधी आहे. 'बिबट्या पहायचाय..? नारायणगाव बायपासला या...!' या टॅगलाईनसह बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दरम्यान, असं असलं तरीही दुसरीकडे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरणही पाहायला मिळतंय.
पुण्यात बिबट्याचा हल्ला
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे बिबट्याने पुन्हा दुचाकीस्वारांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. घोडेगाव-जुन्नर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांवर हल्ला करून तीन जणांना जखमी केले आहे.
आदिनाथ शिंदे, सौरभ सैद, संतोष डोंगरे हे तिघे मोटार सायकलवर वरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या तिघांना उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.