पुणे : बातमी आहे नवीन सुरू झालेल्या पुणे ते सिन्नर रोडवरील चाळकवाडी टोल नाक्याची... सध्या या टोलवर स्थानिक नागरिकांकडून दमदाटी करून हप्ते वसुली आणि टोल कर्मचा-यांना मारहाण सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्हीमध्ये ही दृष्य कैद झाली आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे आम्ही भाऊ असून आमचे कुणीही काहीही करु शकत नाही. तसंच इथल्या टोलमध्ये कर्मचारी कसे काम करतायत हेच पाहतो अशी धमकी दिली जातेय. त्यामुळे अनेक कर्मचारी काम सोडून निघून जात आहेत.


टोल प्रशासनानं याबाबत आळेफाटा पोलिसात तक्रार दाखल केली असून याबाबत पोलीस तसेच आमदार शरद सोनवणे यांना विचारले आसता त्यांनी कॅमे-यासमोर बोलण्यास नकार दिला.