यवतमाळ : राज्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर होत आहे. हा प्रश्न सुटण्याऐवजी त्यात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफी देऊनही आत्महत्या होण्याचे प्रकार थांबताना दिसत नाही. दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी ठरत आहेत. त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही वर्षांपूर्वी कलावती बांदुरकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर शेतकरी कलावती यांच्या नावाची चर्चा झाली. कर्जच्या ओझ्याखाली दबलेल्या पतीने आत्महत्या केली होती. आता पुन्हा एकदा त्यांना धक्का बसलाय. कलावती यांच्या मुलीने काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी कलावती यांची मुलगी पपिता हीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय का घेतला याची माहिती मिळालेली नाही.  पपिताने मारेगाव इथल्या जुन्या कोर्ट परिसरातील असलेल्या शेतातील विहिरीत उडी मारली. मात्र तेथे उपस्थित असलेल्या लोकांना विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. काही लोकांनी पाहिले असता कोणीतही विहिरीत उडी मारल्याचे लक्षात आले. त्यानंतर एका मुलीला विहिरीतून बाहेर काढले. घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी पपिताची चौकशी केली असता तिने माझी कोणाविरोधात ही तक्रार नसल्याचे सांगितले. मी आत्महत्येचा प्रयत्न केला हे आईला सांगू नका असंही तिने पोलिसांना सांगितले.  



पपिताची आई कलावती बांदुरकर या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. २००८ साली राहुल गांधी यांनी कलावती यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते.