BJP MLA Ganpat Gaikwad Shooting Devendra Fadnavis First Comment: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबार प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. गणपत पाटील यांनी शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली असून या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहेत. जखमी अवस्थेतील महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून या प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली आहे. (गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)


फडणवीस काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगरमधील घटनेबद्दल फडणवीस यांना विचारण्यात आलं असता त्यांनी, "कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला. यामागील सत्य आपल्याला काढवं लागेल. यासंदर्भात चौकशीचे आदेश मी पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत," असं फडणवीस म्हणाले. या प्रकरणामध्ये अत्यंत कडक कारवाई केली जाईल," असं फडणवीस यांनी सांगितलं.


शिगेला पोहचला वाद


दरम्यान, गणपत गायकवाड यांनी केलेल्या या गोळीबार प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील भाजपा विरुद्ध शिंदे गट वाद शिगेला पोहचला आहे. मात्र पोलिसांसमोरच 5 गोळ्या झाडणाऱ्या भाजपा आमदाराने या घटनेनंतर काही धक्कादाय खुलासे केले आहेत. नेमकं पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याबद्दलची माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना त्याच पक्षाचा आमदार कायदा हातात घेतो, यासंदर्भात 'झी 24 तास'शी बोलताना आमदार गायकवाड यांनी आधीच प्रतिक्रिया नोंदवली होती.


नक्की वाचा >> '..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही'; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान


आधीच फडणवीसांच्या संदर्भात केलं भाष्य


तुमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून तुम्ही कायदा हातात घेत आहात आणि पश्चाताप नाही असं सांगत आहात, असा संदर्भ देत गणपत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, "मी एक व्यवसायिक माणूस आहे. मला अजिबात पश्चात नाही. माझं आयुष्य खराब होत असेल. माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं. माझ्या मुलांना कोणी गुन्हेगार मारत असतील. मी जगण्यात अर्थ नाही. एक बाप म्हणून मी माझ्या मुलाला मारत असतील तर ते कदापी सहन करु शकत नाही," असं गणपत गायकवाड म्हणाले.


नक्की वाचा >> 'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी


मी त्यांना जिवे मारणार नव्हतो...


तुम्ही पोलिसांसमोर 5 गोळ्या झाडल्या असा आरोप आहे, असं म्हणत गणपत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, "हो मी स्वत: गोळ्या झाडल्या. मला काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलिसांसमोर जर मारत असतील तर मी काय करणार?" असा प्रश्न उपस्थित केला. "पोलिसांनी पकडलं मला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझ्याबरोबर असं कोणी करत असेल पोलिसांसमोर तर मला आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रभर असेच गुन्हेगार पाळून ठेवलेले आहेत," असं आमदार गणपत गायकवाड म्हणाले.