कल्याण-डोंबिवलीतील पाणीपुरवठा खंडित
पावसामुळे मोईली पंपिंग स्टेशनमध्येही पाणी गेले
कल्याण : कल्याण, डोंबिवलीमधील काही भागात पाणीपुरवठा बंद झाला आहे. मोईली पंपिंग स्टेशनमध्ये पाणी साठले असल्याने परिसरात पाणीपुरवठा बंद आहे. पंपिंग स्टेशन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्तांची दिली आहे.
शुक्रवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण-डोबिंवलीतील अनेक सखल भागात पाणी साचले. काल पंपिंग स्टेशनमध्ये पुराचे पाणी साठले होते. त्यामुळे पंपिंग स्टेशन बंद करण्यात आले होते. पंपिंग स्टेशनमध्ये पूराचे पाणी गेल्याने संपूर्ण यंत्रणा बंद पडली होती. आज पूर ओसल्यावर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
मात्र, पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याने, संध्याकाळपर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.