Kalyan Hoarding Collapse: मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपवर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना समोर आली होती. हे होर्डिंग 120 बाय 120 फूट इतके होते. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते. या प्रकरणानंतर मुंबई शहरातील मोठमोठे होर्डिंग पाडण्यात आले, बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली. पण अजूनही भलेमोठे होर्डिंग उतरले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला आहे.  घाटकोपरनंतर आता कल्याणमध्ये होर्डिंग कोसळण्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण सदानंद चौकात भला मोठा होल्डिंग पडला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज झी 24 तासच्या हाती लागले आहे. या चौकात नेहमी लोकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. तसेच गाड्यादेखील मोठ्या संख्येने असतात.  या पडलेल्या होर्डिंगखाली दहा ते बारा दुचाकी आहेत. तसेच एक चारचाकी गाडीदेखील आहे. सुदैवाने चारचाकीतील चालक होर्डिंग पडण्याच्या काहीवेळ आधीच गाडीतून बाहेर पडला होता.


पाहा व्हिडीओ 



गाडीवर होल्डिंग पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावरचं होर्डिंग पडल्याने रस्त्यात ट्रॅफीक झाले आहे. या घटनेमध्ये दोन नागरिक जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 


मुंबईप्रमाणे कल्याणमधील होर्डिंगदेखील अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? हे सांगता येणं कठीण आहे. पण यात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.


होर्डिंगला परवाना होता तरी..


या होर्डिंगला परवाना मिळाला होता पण आता अशी दुर्घटना का  झाली? याचा तपास केला जाईल. यात किती गाड्यांचे नुकसान झाले याचा पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.


कॉन्ट्रॅक्टरकडून नुकसान भरपाई घेणार


कॉन्ट्रॅक्टरने बॅनर लावताना योग्य एसओपीचे पालन केले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतोय, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.नुकसान भरपाई कॉन्ट्रॅक्टरमार्फत दिली जाईल हे पाहून. यात कॉन्ट्रॅक्टरचा निष्काळजीपणा दिसत असून त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच विभागताली संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.