कल्याणमध्ये बुधवारी मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिले शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी आखिलेश शुक्लाला शुक्रवार संध्याकाळी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. एवढंच नव्हे तर स्थानिक रहिवाशांना धमकावत आपण आयएएस अधिकारी असल्याच सांगून धमकवत असे. एवढंच नव्हे तर खासगी गाडीवर अंबर दिवा लावून लोकांवर रुबाब दाखवत असे. या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तर अखिलेश शुक्ला हा शासकीय अधिकारी असल्याने त्याच्या गाडी वरती अंबर दिवा लावण्यात आलेली गाडी देखील खडकपाडा पोलिसांनी जप्त करण्यात आली आहे. कल्याण आरटीओने अखिलेश शुक्ला वापर असलेल्या गाडीला दंड ठोठावला आहे. हा दंड 9500 रुपये इतके आहे. कारण कोणताही अधिकारी नसताना गाडीवर अंबर दिवा वापरल्यामुळे दिवा जप्त करुन गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडीचा इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असतानाही गाडी चार वर्ष रस्त्यावर धावत असल्याच तपासा दरम्यान उघडकीस आलं आहे. 


प्रकरण काय? 


कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईटस इमारतीत बुधवारी राडा झाला. हा राडा अखिलेश शुक्ला आणि त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे यांच्यात झाला. बुधवारी रात्री अखिलेश शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. शुक्ला याने आपल्या मित्रांना बोलावून अभिजीत देशमुख यांना मारहाण केली. या वादात हस्तक्षेप करण्यास गेलेल्यांनाही शुक्लाने मारहाण केली. या प्रकरणावरुन संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यावरुन निवेदन केलं आहे.


मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई 


 विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई सुरु असल्याचं सांगितलं. अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्ला हा एमटीडीसीमधे काम करणारा व्यक्ती असून आपण आयएएस अधिकारी असल्याच सांगत असे. अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. पुढे बोलताना फडणवीसांनी, "जे माज करतात त्याचा माज उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला? वसई विरारला कोणाच्या काळात मराठी माणूस गेला याचा शोध घ्यायला हवा," असा टोलाही लगावला.