आतिष भोईर, कल्याण : कल्याण तहसीलदार आणि लिपीक एसीबीच्या जाळ्य़ात अडकले आहेत. एका जमीनीच्या हरकतीच्या सुनावणी संदर्भात पैशांची मागणी केली होती. 1 लाख 20 हजार घेताना लिपीक मनोहर हर्डीकरला एसीबीने रंगेहात पकडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि मनोहर हरड या दोघांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. एसीबीच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली आहे. आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली.


तक्रारदार यांच्याकडे बांधकाम कंपनीने मौजे वरप ता.कल्याण येथे घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरील  सुनावनीचे निकालपत्र देण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक तहसीलदार दिपक आकडे यांनी स्वत: करिता 1 लाखाची लाचेची मागणी करुन ती कार्यालयीन शिपाई लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड याचेकडे देण्यासाठी सांगितली होते. तर बाबु उर्फ मनोहर हरड याने स्वत:साठी 20,000 रुपयांच्या चेची मागणी केली होती. सापळा रचून केलेल्या कारवाई दरम्यान ठाणे पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावेळी आपला दूरध्वनी क्रमांक देखील जारी केला आहे. 
लाप्रवि ठाणे कार्यालय दूरध्वनी क्रं - ०२२- २०८१३५९८ , २०८१३५९९. टोल फ्री क्रं. 1064