कल्याण : उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या सनम करोटीया या २२ वर्षीय महिलेची भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या करण्यात आली. सनम करोटिया असं या मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने कल्याणात खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनम करोटिया ही महिला सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कल्याण एपीएमसी मार्केटच्या आवारात आली होती. त्या ठिकाणी अगोदरपासून दोन तरूण तिची वाट पाहत उभे होते. ती आल्यानंतर त्या तरूणांनी तिला गाठलं... आणि काही कळायच्या आतच धारदार शस्त्राने तिच्या पोटात आणि छातीवर सपासप वार केले. सनम रक्ताच्या थोराळयात खाली पडल्यानंतर दोघे हल्लेखोर तेथून पळून गेले. एमपीएमसी मार्केटमधील हमालांनी सनमला नजिकच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 


सनम करोटिया हिची हत्या करून हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाले होते. मात्र अवघ्या तासाभरातच पोलिसांनी आरोपी बाबू धकनी याला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असून मारेकरी हे उल्हासनगरमधील असून एकमेकांच्या परिचयाचे होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिलीय. 



मात्र हा हल्ला नेमका का करण्यात आला? याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कल्याणचे महात्मा फुले पोलीस अधिक तपास करीत आहेत.