विकास भदाणे, जळगाव : जिल्ह्यामधल्या धरणगाव तालुक्यातल्या कल्याणेहोळ गावातल्या प्रत्येक विजेच्या खांब्यावर शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेल्या शोधाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच गावातल्या प्रत्येक वृक्षावर त्याचं शास्त्रीय नावही दिलं गेलंय.


बालविज्ञान संस्कार केंद्र सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय गावात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावानं बालविज्ञान संस्कार केंद्र सुरु करण्यात आलं आहे. या केंद्रात दर गुरुवारी गावातले आठवी ते बारावीपर्यंतचे सुमारे सव्वाशे विद्यार्थी एकत्र येऊन विज्ञानाचे धडे गिरवतात. विद्यार्थ्यांना विज्ञान कथा सांगणं, तसंच विज्ञानावर आधारित चित्रपट आणि लघुपट दाखवणं, हे आणि इतर विज्ञानपूरक उपक्रम या केंद्रात चालतात. 



विज्ञानगाव प्रकल्पामुळे कल्याणेहोळ गावातलं वातावरण संपूर्ण विज्ञानमय झालं असून, अबालवृद्धांना विज्ञानाबाबत गोडी निर्माण झाली आहे. या संपूर्ण उपक्रमाला गावकरी तसंच ग्रामपंचायतीचीही मोलाची साथ लाभत आहे. 


आरोग्य विज्ञान केंद्राची स्थापना


गावात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्र, शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र, तसंच महिलांच्या आरोग्यासंदर्भात महिला आरोग्य विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी विज्ञानवादी दृष्टीकोन महत्त्वाचा असतो, हेच या गावानं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.