योगेश खरे, प्रतिनिधी, नाशिक : श्रावण म्हटला की पावसात कांदा भाजी आणि चहा पिणे एक रोमांचक अनुभव असतो. पावसात भिजून अशी कुरकुरीत भजी आणि उबदार चहाचा आस्वाद घेण्याची मजा नाशिकच्या गारेगार वातावरणात तर अनोखी असते. मात्र वाईन कॅपिटलमध्ये हीच कांदा भजी आता वाईनसोबत मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेषतः स्पार्कलिंग फ्लेवर्ससोबत गरमागरम कुरकुरीत भजीच टेस्टिंग खूपच मजेदार होतेय. मीठ लावलेल्या मिरचीचा झटका याला अधिकच लज्जतदार बनवतो आहे.  नाशिकचा हा नवीन स्वाद या पावसाळ्यातील सर्वाधिक लोकप्रिय मेनू ठरला आहे.


इतकच नाही तर मुगाची भजी, बटाटे भजी, गिलके भजी, कारले भजी सुद्धा विविध फ्लेवर्स सोबत दिली जाते. तर वाईनसोबत उन्हाळ्याच्या दिवसात नाशिकच्या लोकप्रिय मिसळचा झटका आणि थंडीत गुजराती लोकांचा लोकप्रिय ढोकला फाफडा यशस्वी ठरला आहे.


पर्यटनासाठी  देशात लोकप्रिय होत असलेली ही नगरी मंदिरे सह्याद्री शिखरे, धरणे आणि पावसासाठी मुंबईकराना अधिक जवळची वाटते आहे. आता अशा वैविध्यपूर्ण आस्वादानी अनेक खवय्यांची पर्यटन राजधानी ठरली आहे.