पायी शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांच्या घोळक्यात घुसली कार
या घटनेत 2 साईभक्त गंभीर असल्याची प्राथमिक माहीती
मुंबई : कांदीवलीतल्या समता नगर येथुन शिर्डीला पायी पालखी घेवुन निघालेल्या साईक्तांच्या घोळक्यात कार घुसल्याने मोठा अपघात घडलाय. नाशिक जिल्ह्यातील पांगरी जवळ ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत 2 साईभक्त गंभीर असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने आलेल्या या कारने पालखीत वाहणाऱ्या सुमारे वीस ते पंचवीस भाविकांना धडक दिल्याने हे भाविक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ शिर्डीतील सुपर स्पेशालेटी रुग्णालयात आणण्यात आले असुन इथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
जखमींवर उपचार
या घटनेत अनेकांना गंभीर मार लागला आहे. काही भक्तांवर सिन्नर मधील खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. साईरामाची पालखी ही कांदीवली वरुन पंधरा डिसेंबर ला शिर्डी साठी निघाली होती. आज हे भक्त पांगरी येथे साईबाबा संस्थानने उभारलेल्या पालखी निवार्यात थांबुन त्या नंतर शिर्डीकडे मार्गस्थ होत असतांना संध्याकाळी हा अपघात घडला आहे.
दोघांची प्रकृती चिंताजनक
यात दोन साई पदयात्री भक्तांची प्रकृती चितांजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींवर तातडीने उपचार केले जात असून आपण खासगी डॉक्टरही त्यांच्या मदतीला पाठवले असल्याचे नगरसेवक गणेश भोईर यांनी 'झी 24 तास' ला सांगितले.