कन्हैया कुमारचं महाराष्ट्रातील व्याख्यान वादात येणार
काँग्रेसने या कार्यक्रमाला समर्थन दर्शवलय. तर कन्हैया हा वादग्रस्त असल्याचं आणि देशद्रोही असल्याचं भाजपाच्या लोकांचं म्हणणं आहे
अहमदनगर : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचं योगदान देणारे नगर जिल्ह्याचे भूमीपुत्र कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या 23 व्या स्मृती दिनी निमित्तानं संगमनेरमध्ये कन्हैया कुमारचं व्याख्यान ठेवण्यात आलंय.
या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपा पदाधिका-यांनी केली आहे. तर काँग्रेसने या कार्यक्रमाला समर्थन दर्शवलय. तर कन्हैया हा वादग्रस्त असल्याचं आणि देशद्रोही असल्याचं भाजपाच्या लोकांचं म्हणणं आहे.
मात्र त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. आमची मते आम्ही रविवारच्या सभेत मांडू, असं दत्ता देशमुखांचे पुत्र मोहन देशमुख यांनी सांगितलं.