कणकवली : सिंधुदुर्गात कणकवली नगरपंचायत निवडणूक मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. सकाळी मतदानासाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणे यांनी भाजपशी मिळते जुळते घेत भाजपच्या मतदतीने ते राज्यसभेवर निवडले गेलेय. राणे राज्यसभा खासदार झालेत तरी सिंधुदुर्गात भाजप विरोधात त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक लढविताना चित्र दिसून येत आहे. सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेची युती पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, सिंधुदुर्गात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध स्वाभिमान पक्षाची आहे. मात्र, ज्या भाजपच्या मदतीने राणे खासदार झालेत. ते पाहता राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राणे नगरपंचायतीत निवडणुकीत आपले वर्चस्व निर्माण करतात की शिवसेना यश मिळते याकडे लक्ष लागलेय.