Contractual Recruitment: पहिली कंत्राटी भरती शरद पवार यांच्या एनसीपीने शिक्षण विभागात पहिली कंत्राटी भरती सुरु करण्यात आली. 2010 साली अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला. यामध्ये वाहन चालक, तांत्रिक, लिपिक, शिपाई पदांचा जीआर काढण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरएफपीला सरकारची मान्यता मिळाली. मसूदा मंजुर झाला, निवदा निघाल्या. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवत कंत्राटी भरतीला मान्यता मिळाल्याचा आरोप केला. 


हे संपूर्ण पाप कॉंग्रेसचं, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. आमच्याही काळात कंत्राटी लोकं घेतली आहे. पण आता विरोधक आंदोलन करत आहेत. त्यांना लाज, शरम वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. 


मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायच? असा प्रश्न मी त्यांना विचारला. 


आम्ही कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.