पुणे : Hijab controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटताना दिसून येत आहेत. हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. (Hijab controversy: NCP Agitation in Pune) हे आंदोलन महात्मा फुले वाड्यासमोर सुरु केलेय. तर दुसरीकडे हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक काढण्यात आली आहे. (Karnataka Hijab Case: Procession by Hindu Mahasangh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिजाब वाद प्रकरणाचे महाराष्ट्रात आता पडसाद उमटू लागले आहे. कर्नाटकमधील (Karnataka) हिजाब (Hijab Row) प्रकरणाचे पडसाद आता राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या प्रकरणावरुन आता राष्ट्रवादी (NCP) आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीकडून पुण्यात (Pune) आंदोलन करण्यात आले आहे. 



हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून मिरवणूक काढण्यात आली. कसबा गणपती समोरुन मिरवणुकीला सुरुवात झाली. मुस्लिम महिलांकडून जर हिजाबचे समर्थन होत असेल आम्ही देखील भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू, असे प्रत्युत्तर हिंदुमहासंघाने दिले आहे.


हिजाबच्या समर्थनार्थ सोलापुरात आंदोलन



काल हिजाबच्या समर्थनार्थ सोलापुरात दोन मोठी आंदोलने झाली. शेकडो मुस्लिम महिला अचानक कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणात येऊन निदर्शने केली. या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटक सरकारविरोधात तसेच मोदी सरकारविरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे सोलापूर कर्नाटक सीमेवरही प्रहार संघटनेने हिजाबच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.