Kavathe Mahankal Vidhansabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कल समोर येऊ लागले आहेत. यानुसार महायुती आघाडीवर असून महाविकास आघाडी पिछाडीवर दिसतेय. कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले  होते. सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक यंदा लक्षवेधी ठरली होती. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा खरंतर आर आर आबा पाटील (R R Patil) यांचा गड. सध्या आर आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाच्या आमदार होत्या. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान होतं. पण येथे रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील विजयी झाले आहेत.स्वर्गीय माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी विजय मिळवला. 28 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचा पराभव केलाय. रोहित पवार हे सर्वात कमी वयाचे आमदार होणार आहेत. सुरुवातीपासूनच प्रत्येक फेरीत रोहित पवार हे आघाडीवर दिसत होते. 


19 व्या फेरीनंतर रोहित पाटील हे 25 हजार 464 मतांनी आघाडीवर आहेत. आणखी 3 फेऱ्यांचे कल येणे बाकी आहे.


सातव्या फेरीअखेर रोहीत पाटील हे 8715 मतांनी आघाडीवर आहेत.


10.45 वा. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पाटील 8,764 मतांनी आघाडीवर..राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजय काका पाटील पिछाडीवर


निवडणुकीचे पहिले कल हाती आले तेव्हा रोहित पाटील हे आघाडीवर पाहायला मिळाले.


विरोधकांच्या संघर्षाला सामोरं जावं लागणार


आर आर आबा पाटील यांना त्यांच्या हयातीत पक्षातल्या संघर्षाबरोबर विरोधकांच्या संघर्षाला देखील सामोरे जावं लागलं. गेल्या वर्षी पार पडलेल्या कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटलांना सर्व विरोधकांनी एकत्रित घेरण्याचा प्रयत्न केला. आता त्याच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीत देखील विरोधकांकडून रोहित पाटलांना चितपट करण्यासाठी डाव टाकायला सुरुवात झालीय. त्यामुळे आबांच्या वारसाची वाट खडतर आहे असंच चित्र दिसतंय. कवटे महाकाळच्या मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय? हे स्पष्ट होणार आहे.