Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील भरतीमध्ये सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी, उपमुख्य लेखा परीक्षक ही पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. केडीएमसी अंतर्गत एकूण 3 रिक्त जागा भरल्या जातील. या अंतर्गत सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक, सेवानिवृत्त लेखाधिकारी आणि उपमुख्य लेखा परीक्षकची प्रत्येकी 1 जागा भरली जाणार आहे. 


कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय परिवहन सेवेतून उप परिवहन व्यवस्थापक म्हणून सेवा निवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्त उमेदवार सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक पदासाठी अर्ज करु शकतात.


सेवानिवृत्त लेखाधिकारी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका येथे लेखा विभागात काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. 


उपमुख्य लेखा परीक्षक पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराकडे कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकेत लेखा परीक्षण विभागात काम केल्याचा अनुभव असलेल्यांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. 


उमेदवारांना कल्याण येथे नोकरी करावी लागेल. तसेच यासाठी 65 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. उमेदवारांनी आपले अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिका, परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण - पश्चिम येथे आपले अर्ज पाठवायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 डिसेंबर 2023   पर्यंत अर्ज करता येणार आहे.  दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. तसेच अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा