Kolhapur News : कोल्हापूरातील ऐतिहासिक अशा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री दहाच्या दरम्यान आग लागल्याची बातमी समोर आली आहे. वारसा स्थळाला अनुसरून नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते. अशातच आता नाट्यगृहाला आग लागल्याने कोल्हापूरकरांना मोठा धक्का बसला आहे. आग लागल्यानंतर तातडीने महापालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, आगीने तोपर्यंत विशाल रूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाला मोठी मेहनत घ्यावी लागली. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला आहे आणि छत देखील कोसळल्याची माहिती मिळतीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉकसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती. थिएटरला लागलेल्या आगीमुळे कोल्हापूरातून हळहळ व्यक्त होत आहे. या आगीत खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज आहे. या मैदानातील सभामंडपालाही आग लागल्याचे बोलले जात आहे.