प्रताप नाईक, कोल्हापूर : महापुरात (flood-affected village) बुडालेले कोल्हापूरचे (Kolhapur ) खिद्रापूर गाव (Khidrapur village ) सलमान खानच्या (Salman Khan) बिईंग ह्युमन संस्थेने (Being Human Institute) दत्तक (adopte) घेतले आहे. सलमान खान १०० घरं बांधणार आहे. सलमानच्या उपक्रमाचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीत आलेल्या महापुरात खिद्रापूर गाव तब्बल १९ दिवस पाण्यात बुडाले होते. महापुरात घरदार, संसार सगळंच वाहून गेले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक दबंग भाईजान आता धावून आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळं अनेकांचे संसार उघड्यावर पडले. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारसोबतच लाखो दानशूरांचे हात पुढे आले. त्यातला एक हात आहे अभिनेता सलमान खान याचा. कोल्हापुरातील खिद्रापूर गाव दत्तक घेण्याचा निर्णय सलमान खानची बिईंग ह्युमन संस्था आणि ऐलान फाऊंडेशनने घेतला आहे. ग्रामसेवक महालींग अकिवाटे यांनीही याला दुजोरा दिला आहे.


सलमान गाव दत्तक घेतल्याचे कळताच गावकऱ्यांनी फटाके फोडले, सलमान खानचे बॅनर लावून आभार मानलेत. गावकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न सलमान खान करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले. सरपंच हैदर खान मोकाशी आणि ग्रामस्थ डॉ राजगोंडा पाटील यांनीही याबाबत माहिती दिली.



 
दबंग अभिनेता ही सलमान खानची ओळख. या ना त्या वादामुळे देखील सलमान नेहमीच चर्चेत असतो. पण आता पूरग्रस्तांसाठी घरं बांधण्याचा संकल्प करून सलमानने तो खराखुरा भाईजान असल्याचं सिद्ध केले आहे.