नवी मुंबई : सानपाडा येथे मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेय. १५ वर्षीय मुलगी रस्त्याने चालत असताना भावाला ढकलून दोन तरुणांनी अपहरण केले. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एका पांढऱ्या रंगाच्या ओमनी कारमधून आलेल्या दोन मुलांनी मुलीला खेचून गाडीत बसवले आणि तिला पळवून नेले. मुलांचे चेहरे होळीच्या रंगाने माखलेले होते. त्यामुळे त्यांना कोणी ओळखलेले नाही. 


 भाऊ आणि बहीण सानपाडा येथील बुद्धेश्वर मंदिरात दर्शनाला जात असताना भावाला धक्का मारुन दोघांनी बहिणीला गाडीत ओढले.  सानपाडा सेक्टर १४ मध्ये ही घटना घडली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस गाडीचा आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत.