`हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल, कारवाई न केल्यास कोर्टात दाद मागणार`
किरिट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि कुटुंबाविरोधात विविध कलमांखाली तक्रार दाखल केली आहे
कोल्हापूर : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर दोन साखर कारखान्यांधमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्या यांनी कोल्हापूरमधल्या मुरगूड पोलीस स्थानकात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांविरोधात तक्रार दाखल केली.
हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत हसन मुश्रीफ, त्यांच्या पत्नी शाहिरा हसन मुश्रीफ, नाविद मुश्रीफ, आबीद मुश्रीफ यांच्यासह विविध कंपन्यांचे संचालक, बेहिशेबी मालमत्ता गुंतवणूक करणारे चंद्रकांत गायकवाड, जयेश दुधेडिया, महेश गुरव यांची नावं आहेत. या सर्वांच्या विरोधात 120, 420, 468, 471 आणइ 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा असं म्हटलं आहे.
पोलिसांनी सात दिवसांच्या आत एफआयआर रजिस्टर केला नाही तर आपण वरच्या कोर्टात जाणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच पोलिसांनी हसन मुश्रीफ आणि कुटुंबावर कारवाई करावी अशी मागणी केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
किरिट सोमय्या यांचा आरोप
कागलमधील सर सेनापती साखर कारखान्यात घोटाळ्या झाल्याचा आरोप करुन त्यासंदर्भातील कागदपत्र ईडीकडे दिली होती. त्यानंतर सोमय्या यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र सादर केली. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.