हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे  :  ग्रामीण महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर बैलगाडा शर्यत पुन्हा झाली. शर्यतीच्या बैलांना पुन्हा लाखोंचा भाव आला. शर्यतीसाठी दणकट असणाऱ्या बैलांच्या खरेदी-विक्रीचाही धुरळा उडू लागला आहे. त्यात डुंबरवाडी गावच्या प्रमोद डुंबरेंच्या बजरंगी नावाच्या बैलानं तर कहरच केला आहे. शर्यतीत पहिला आलेल्या बजरंगीनं खरेदीच्या बोलीतही पहिला नंबर पटकावला. (kishor and baban dangat from junnar bought bajrangi bull for rs 25 lakh at auction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बजरंगीला चक्क फॉच्यूर्नरपेक्षाही अधिक किंमत मिळाली. बजरंगी दिसायला डौलदार. पांढऱ्या रंगाचा चपळ बजरंगी शर्यती गाजवतो. म्हणूनच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीच्या किशोर दांगट आणि बबन दांगट या शेतकरी भावंडांनी तब्बल 25 लाख रुपये त्याच्यासाठी मोजलेत. दांगट बंधूंना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीची आवड. हौसेला मोल नसतं म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या पिंट्या बैलाला बंजरंगीची जोड दिलीय.



शर्यती सरू झाल्यामुळे बैलांना सोन्याचा भाव आलाय. बैलांच्या किमती पुढच्या काळात वाढत्याच राहणार असल्याचं बैलगाडा मालकांचं म्हणणंय. बैलगाडा शर्यतीमुळे भीर्रर्रचा नाद तर घुमू लागलाच आहे. पण बजरंगीसारख्या डौलदार बैलांना महागड्या गाड्यांएवढी किंमत मिळू लागली आहे.