कोल्हापूर : काय तरी पदरात पडतंय त्यामुळे केंद्राचं १० टक्के आरक्षण घ्या असं म्हणणाऱ्यांनी EWS आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला फटका बसणार नाही, अस  लिहून द्यावे  असं जाहीर आव्हान खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिलंय. मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी EWS आरक्षणा संदर्भात छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात भूमिका मांडुन संभाजीराजे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात संभाजीराजे यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे  कोल्हापूरातील पाटगाव याठिकाणी संघर्ष यात्रा काढण्यात आली, ही संघर्ष यात्रा  खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली. यानिमित्त पाटगाव ते आदमापूर मार्गावर भव्य बाईक रॅली काढण्यात आली. खासदार संभाजी राजेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. मौनी महाराज समाधी स्थळाच दर्शन घेवून आंदोलनाला सुरुवात झाली. 


विशेष म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर खासदार संभाजीराजे हे प्रथमच आंदोलनात सहभागी झालेत. काहीही झालं तरी आत्महत्या करु नका अशी शपथ यावेळी खासदार संभाजी राजेंनी मराठा तरुणांना घ्यायला लावली. तसंच EWS नको असं सकल मराठा समाज म्हणतो. फक्त संभाजीराजेंचं हे म्हणणं नाही असं म्हणत प्रवीण गायकवाडांना टोला लगावला.