प्रणव पोळेकर,  झी मीडिया, रत्नागिरी :  मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता कोकण रेल्वेला बसू लागला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशीराने धावत आहेत. त्यामुळे गणेशोत्वासाठी आलेल्या चाकरमन्याचे परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या ह्या सहा ते सात उशिराने धावत आहेत. त्याला कारण आहे ते म्हणजे मध्य रेल्वे कडून येणारे रेक हे वेळेत येत नसल्यामुळे कोकण रेल्वे वरून गाड्या ह्या उशिराने धावत आहेत त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईतून एकही रेक न आल्यामुळे हा सगळा प्रकार झाल्याचं सांगितलं जातं आहे. तर दुसरीकडे तळ कोकणातून रेल्वे ह्या हाऊसफुल होऊन आल्यामुळे रत्नागिरी स्थानकावर दरवाजेच उघडले गेले नाहीत त्यामुळे देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. जी परिस्थिती रत्नागिरी स्थानकावर होती तीच परिस्थिती चिपळूण, खेड स्थानकावर पाहायला मिळाली.


तर कोकण रेल्वेने देखील प्रवाशांना आवाहन केलं आहे की प्रवासाला बाहेर पडताना आधी रेल्वेच्या वेबसाईट आणि कॉल सेंटरला गाड्यांची माहिती घेऊनच बाहेर पडणे अस आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतेय...


रेल्वेमंत्री कोकणाचे असूनही कोकण रेल्वेच्या प्रवाशांना ऐन गणेशोत्सवात सर्वच संकटाचा सामना करत आपला उत्सव पार पाडावा लागतोय.. स्पेशल वाढीव ट्रेनच्या भरमसाठ घोषणा आणि  स्टेशनवर बंददारांच्या ट्रेनचे असलेले वास्तव या सगळ्यात भरडला जातोय तो फक्त चाकरमानी.