कापलेल्या केसांचं खत करणारा अवलिया
ऐकुन धक्का बसला ना?
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : खत तयार करण्यासाठी आजवर बऱ्याच गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. मुळात टाकाऊ गोष्टींचा वापर करत त्यापासून खतं तयार करण्याकडे अनेकांचा कल असल्याचंही पाहायला मिळालं. पण, कधी केसांपासून खत तयार करण्यात आल्याचं तुम्ही ऐकलं आहे का?
केसांचा वापर झाडं लावण्यासाठी सुद्धाही करता येतो. ऐकुन धक्का बसला ना? पण हे खर आहे. कोल्हापुरातल्या कट्स सलूनमधील शेळके बहिणभावाने हे करुन दाखवलं आहे. सलुनमधील केसांचा पुरेपुर वापर करुन त्यांनी सलुन परिसरात छोटासा बगीचाच फुलवला आहे.
सलूनमध्ये रोज कापलेल्या केसांचा कचरा होतो. हा कचरा म्हणजेसुद्धा एक समस्याच असते. पण यावर मनिष आणि स्वाती शेळके या बहिण-भावांनी उपाय शोधला आहे. स्वाती आणि मनिष यांचं सलून आहे. या सलूनमधला केसांचा कचरा ते फेकून देत नाहीत. रोज साचलेल्या कचऱ्यापासून ते झाड लावण्यासाठी एक कुंडी तयार करतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांनी एकही केस कचराकुंडीत टाकलेला नाही.
'ते दहशतवादी नव्हे, विद्यार्थी आहेत', जामिया प्रकरणी बॉलिवूडकरांचा संताप
केसांवर झाडं उगवतात ही कल्पना लोकांसाठी नवी आहे. ग्राहकांनीही या कल्पनेचं स्वागत केलं आहे. अनेकांना केस नकोसे वाटतात. पण शेळके भावंडांनी कचऱ्यातल्या केसांचा कल्पकतेनं वापर केला आहे. टाकाऊ केसांवर फुलवलेली ही बाग सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी आहे.