कोल्हापूर आंबाबाई मंदिर पुजारी हटावचा वाद कोर्टात
आंबाबाई मंदिरातल्या पुजारी हटावचा वाद आता कोर्टात पोहोचलाय. श्री पुजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही सुनावणी घेण्याचा आधिकार नसल्याची भूमिका मांडत कोर्टात धाव घेतलीय.
कोल्हापूर : आंबाबाई मंदिरातल्या पुजारी हटावचा वाद आता कोर्टात पोहोचलाय. श्री पुजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही सुनावणी घेण्याचा आधिकार नसल्याची भूमिका मांडत कोर्टात धाव घेतलीय.
यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान आंबाबाई भक्त मंडळाला यामध्ये प्रतिवादी करण्यात आलं नसल्यामुळे आंबाबाई भक्त मंडळाचे सदस्य दिलीप पाटील आणि दिलीप देसाई स्वतः प्रतिवादी होण्याची विनंती कोर्टाला करणार आहेत.
यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे.