मुंबई:  राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वेगानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अर्थात अजून पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला नसला तरी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये दर्शनावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या नव्या निर्बंधांचा कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा देवाच्या भक्तांना फटका बसला आहे. तुम्ही जर अंबाबाई किंवा ज्योतिबाच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप जास्त महत्त्वाची आहे. 


कोरोनामुळे आता बऱ्याच मंदिरांमध्ये दर्शनासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग करूनच दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा ऑनलाइन दर्शनाचे वाढत्या कोरोनामुळे कमी करण्यात आले आहेत. 


 



तासाला फक्त 400 भाविकांनाच दर्शन मिळणार आहे. देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनामुळे तासाला केवळ 400 भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.


कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या सर्व गोष्टींचं भाविकांना पालन करणं बंधनकारक असणार आहे. नव्या स्लॉट पद्धतीची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी गर्दी न करण्याचे देवस्थान समितीकडून भाविकांना आवाहन करण्यात आलं आहे.