महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील घटना. आपल्या 63 वर्षांच्या आईची हत्या करुन तिचे अवयव कापून खाल्लाचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात आरोपीला दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इतका निर्घृण प्रकार याआधी पाहिला नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने या प्रकरणाबद्दल केली होती. हे प्रकरण 28 ऑगस्ट 2017 मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील माकवाला वसाहतीत घडलं होतं. 35 वर्षाच्या मुलाने आपल्या आईची निघृण हत्या केली आहे. दारु प्यायला पैसे न दिल्याने या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे मारलं आहे. हा मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने आपल्या आईचे तुकडे करण्यास सुरुवात केली. पुढे त्याने आपल्या आईचे अवयव बाहेर काढले. या आरोपी मुलाचं नाव आहे सुनील कुचकोरवी. 


या 'क्रूर आणि रानटी' गुन्ह्यासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. ही फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. फाशीची शिक्षा सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं निरीक्षण न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला आहे. 


काय आहे प्रकरण? 


28 ऑगस्ट 2019 मध्ये सुनील कुचकोरवी याने आपल्या 63 वर्षांची आई यल्लमा कुचकोरवी यांची निर्घृणपणे हत्या केली. एवढ्यावर हा आरोपी मुलगा थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे अवयव काढून त्याला मीठ, मसाला, तेल लावून पॅनमध्ये तळले आणि खाल्ले. 2021 मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने कुचकोरवलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कुचकोरवीनेही शिक्षेला आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. 


आरोपीची शिक्षा कायम ठेवण्याचं कारण 


कुचकोरवी याला जन्मठेपेची शिक्षा दिल्यास तो इतर कैद्यांसाठी धोकादायक ठरु शकतो. जी व्यक्ती आईची हत्या करु शकतो त्याचा इतरांना धोका अधिक. 
या व्यक्तीला सोडल्यास समाजात गुन्हा करण्याचे स्वातंत्र्य दिल्यासारखे असल्याचं न्यायालयाने नोंदविलं. 
या सुनावणीला उच्च न्यायालयाने कुचकोरवीला पुण्यातील येरवडा कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले.