कोल्हापूर : कोल्हापूरमधुन युतीचा प्रचाराचा आज नारळ फुटणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवन मैदानावर सभा होणार आहे. यानिमित्त युतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. आता इथून हे दोघं हॉटेल सयाजी इथं जाणार असून तिथे त्यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सभास्थानी पोहोचतील.


या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह महायुतीचे सर्व नेते हजर असणार आहेत. भंडारा गोंदियातून सुनील मेंढे, माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर तसंच साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा आजच्या सभेत होणार आहे. सभेनंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरी जाणार आहेत.