कोल्हापूर : कोल्हापूरमधल्या अंबाबाईच्या मंदिरातल्या श्रीपूजकांना कोर्टानंही झटका दिलाय. श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दाखल केलेला अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीपूजकांना अंबाबाईच्या मंदिरातन हटवण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी सुनावणी घेऊ नये यासाठी मुनिश्वर यांनी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावलीय. 


जिल्हाधिकारी हे दंडाधिकारी असतात त्यामुळं त्यांना सुनावणी घेण्यास मनाई करता येणार नसल्याचं न्यायलयानं स्पष्ट केलंय. त्यामुळं जिल्हाधिका-यांच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झालाय.