कोल्हापूर : ग्रामीण भागात अनेक प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. अशीच परंपरा पाडव्याच्या निमीत्तान कोल्हापूर शहरतील कसबा बावडामध्ये पहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षापासुन कसबा बावड्यातील शेतकरी पाडव्याच्या मुहुर्तावर म्हैस पळवुन आनोखी परंपरा जोपासतायत.


या आनोख्या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी शेतकरी सकाळी आपल्या म्हैशीला अंघोळ घालातात आणि त्यानंतर त्यांना सजवून या स्पर्धेत भाग घेतात. शेतकरी पुढं पळत असतो आणि त्याच्या पाठोपाठ म्हैस धावत असतात.



ही आगळी आगळी वेगळी स्पर्धा पहाण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झालेली असते. सुगीची कामं आटोपल्यानंतर बळीराजाला विरंगुळा म्हणुन सुद्धा या स्पर्धेकडं पाहिलं जातं.