प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होतं. शाडूच्या मूर्ती बनवाव्या तर मातीचा तुटवडा... मग इकोफ्रेन्डली गणेश मूर्ती बनवायच्या कशा ? असा प्रश्न निर्माण होतो. पण यावर उपाय शोधलाय कोल्हापुरातल्या स्पेशल विद्यार्थ्यांनी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो कुठल्या गणपती तयार करणा-या कुंभार गल्लीतलं नाही तर कोल्हापुरातल्या चेनता अपंगमती शाळेतलं हे दृष्य आहे... बाप्पाची मूर्ती बनवण्याची लगबग अंतिम टप्प्यात आहे. गणपती मूर्ती तयार करण्याचं काम ही स्पेशल मुलं मोठ्या खुबीनं करतायत. विशेष म्हणजे या मूर्ती शंभर टक्के पर्यावरणपूरक आहेत. 


गेल्या 31 वर्षांपासून गतिमंद मुलांचं शिक्षण, पुनर्वसन या क्षेत्रात चेतना अपंगमती संस्था कार्यरत आङे. मुलांच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संस्थेनं नेहमीच प्रयत्न केलेत. त्याचाच भाग म्हणून कागदी लगदा आणि नैसर्गिक रंगांपासून मूर्ती बनवण्याच्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यातून या स्पेशल मुलांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच आणि सोबतच त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी देखील या उपक्रमाचं तोंड भरुन कौतुक केलंय. 
   
पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या या उपक्रमाला समाजातले अनेक जागृत नागरिक हातभार लावतायेत. शरिरानं आणि बुद्धीनं धडधाकट असणारी माणसं आज नकारत्मकतेच्या गर्तेत सापडली असताना ही स्पेशल मुलं म्हणजे आपल्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशवाट शोधण्याचा एक आदर्शच म्हणावा लागेल.