कोल्हापुरमध्ये धान्य वितरणात घोटाळा, रेशन दुकानांचे परवाने रद्द
५ रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले
प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : कोरोनाचे संकट सुरु असल्याने गरिबांचे खायचे हाल सुरु आहेत. शासनातर्फे यांच्यासाठी रेशनवर धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पण काही रेशन दुकानदार जाणिवपूर्वक रेशन देण्याचे टाळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अशा रेशन दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात करण्यात येत आहे. कोल्हापुरात हा प्रकार घडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप करत असताना रेशन धान्य दुकानदारांनी काहींना जाणिवपूर्वक धान्य न दिल्याच्या तक्रारी जिल्हा धान्य पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या. त्यानंतर धान्य वितरणात गोंधळ घालणाऱ्या ५ रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
कोल्हापूर शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ३ रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. इथून पुढे कोणत्याही रेशन दुकानदाराने अशी कृती केली तर त्यांचेही परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.