कोल्हापूर : आईच्या अंत्यसंस्काराला पत्नी आणि मुलांसह जाताना अपघात झाल्याची दुर्देवी घटना कोल्हापुरात घडली आहे. या अपघातात इसमाची पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाले आहेत. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील गावठाण मध्ये ही घटना घडली. गावठाण मधील मारुती नांदवडेकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



अल्टो कार झाडावर आदळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.  सोहम आणि वासंती नांदवडेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलगा आणि पत्नीचे नाव आहे. पुण्याहून नांदवडेकर कुटुंब गावी जात असताना हा अपघात झाला. गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.