कोल्हापुरचे आमदार म्हणतात,`त्याला काय हुतंय?`
कोरोनाच्या काळात हा प्रश्न पडतोय?
मुंबई : कोरोनाने आता शहरापासून अगदी गावांनाही वेढीस धरलं आहे. कोरोनाच्या लोकसंख्येत वाढ होत आता या विषाणूने गावातही आपलं जाळं पसरलं आहे. गेल्या साडे चार महिन्यांपासून कोरोना जगभरात थैमान घालत आहे. अशावेळी आपण गावात न आलेल्या कोरोनामुळे #त्यालाकायहुतंय? म्हणतं नाकारणं योग्य नाही. कोल्हापुरातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी त्याला काय हुतंय? म्हणत काळजी न घेणं हे जास्त घातक आहे.
आता आपण आपल्याकरता आणि आपल्या कुटुंबाकरता कोरोनायौद्धा व्हायला हवं. प्रत्येकाने दिलेले सर्व नियम पाळायला हवेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केले तरी आपण गर्दी करणं टाळायला हवं. आणि त्याला काय हुतंय? असा विचार न करता जबाबदारी सांभाळायला हवी, असा निरोप कोल्हापुरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी एका अनोख्या व्हिडिओतून दिलाय.
ऋतुराज पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापुरकरांचा कोरोनाकडे बघण्याचा दृष्टीकोन समोर आणला आहे. आपण एवढे दिवस काळजी घेतली आणखी काही दिवस कोरोनामुळे आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.