आईचा खून करून शरीराचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा
आईचे काळीज कापून (Mother`s murder) खाणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur District Sessions Court) फाशीची शिक्षा (death penalty) सुनावली आहे.
कोल्हापूर : आईचे काळीज कापून (Mother's murder) खाणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur District Sessions Court) फाशीची शिक्षा (death penalty) सुनावली आहे. (Mother Murder in Kolhapur) सुनील रामा कूचकोरवी असे क्रूर आणि निष्ठूर मुलाचं नाव आहे. आईच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर शरीराचे तुकडे नराधमाने फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ऑगस्ट 2017 मधील धक्कादायक घटना घडली होती. जिल्हा न्यायाधीश महेश जाधव यांनी निकाल देताना फाशीची सुनावली आहे. आरोपीने आईचा खून करून घृणास्पद कृत्य केलं आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
ऑगस्ट 2017मधील कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून सुनील याने घरामध्येच आईची निर्घून हत्या केली. त्यानंतर सुनीलने धारदार शस्त्राने आईचे एक एक अवयव धडापासून वेगळे केले. इतकच नाही तर आईचं काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्न देखील सुनील याने केला होता.
कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सहा जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. आज सत्र न्यायाधीश जाधव यांनी ही दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची घटना असल्याचे नमूद करत करत आरोपी सुनील याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान आरोपी सुनील याला शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहाकडे घेऊन जात असताना त्याचं चित्रीकरण करणार्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी संजय मोरे यांनी दिली.