प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकने मजुरांना धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर सात मजूर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने उडवल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात चार जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. टेम्पोला जोडलेले सेंट्रिंगचे मिक्सर मशीन रस्त्याकडेला उभं करत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मजुरांना जोराची धडक दिली.


बंगळुरुहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्याने चार जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील मृत व जखमी सेंट्रींग कामगार भादोले गावचे रहिवासी आहेत. या भीषण अपघातात सचिन धनवडे (वय 40) बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32),आणि श्रीकेश्वर पासवान (वय 60) असे एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सुनिल कांबळे,सचिन नलवडे ,लक्ष्मण मनोहर राठोड, ऐश्वर्या लक्ष्मण राठोड, सविता लक्ष्मण राठोड ,कुमार अवघडे अन्य एक (सर्व रा.भादोले ) हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. 


मृत आणि जखमी सेंट्रींग कामगार हे सेंट्रींग मिक्सर रस्त्याच्या कडेला उतरवत असताना बेंगलोरच्या दिशेहून पुण्याला जाणाऱ्या भरदार ट्रकने उडवले.. ज्यामध्ये चार कामगार हे जागीच ठार झाले, तर सात कामगार हे जखमी झालेत. भादोले गावातील हे मजूर रियाज कंट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातातील जखमींच्यावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि पेठ वडगाव इथल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.