कोल्हापूर : चेष्टेच्या भरात एअर कॉम्प्रेसरची हवा गुदद्वारात भरल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील हेर्ले गावच्या युवकाचा मृत्यू झाला. अदित्य जाधव असं युवकाचं नाव आहे. ही घटना माणगाववाडीमधील पार्वती फौंड्रीमध्ये घडली आहे. हेर्ले गावचा रहिवासी असणारा आदित्य दत्तात्रेय जाधव हा 29 वर्षीय युवक माणगाववाडीमधील पार्वती फाउंड्रीमध्ये कामाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 सप्टेंबरला अंगावरची धूळ झाडात असताना या फाऊंटनमध्येच एका व्यक्तीनं आदित्य जाधवच्या गुदद्वारात एअर कॉम्प्रेसरची हवा मारली. ही हवा थेट अदित्यच्या आतड्यांमध्ये गेली त्यामुळे तो जागेवर कोसळला. त्यानंतर त्याला उपचारासाठी कोल्हापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण या उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.