प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : 40 आमदारांसह 12 खासदारांच्या फुटीनंतर शिवसेनेत (Shivsena) ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. राज्यात सत्तातरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर आलं आहे. यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठी फूट पडली आहे. काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. अशातच शिंदे गटातील मंत्री राजेश क्षीरसागर (rajesh kshirsagar) यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात (kolhapur) बॅनरबाजी करण्यात आलीय. मात्र या शुभेच्छांच्या पोस्टरवरुन नवा वाद उफाळून आलाय. या होर्डिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे (anand dighe) यांचाही फोटो लावण्यात आलाय. मात्र हे होर्डिंग एका कुख्यात गुंडाने लावल्याने चर्चांना उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर शहरात खूण, मारणारी, सावकारी प्रकरणातील गुंड अमोल भास्कर याचे शहरातील मुख्य चौकात भले मोठे होर्डिंग्स लागले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या होर्डिंगवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो देखील लावण्यात आलाय. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गुंड अमोल भास्कर याने स्वतःला सामाजिक कार्यकर्ते ही उपाधी लावत शहरात होर्डिंगबाजी केली आहे. यामुळे आता नागरिकांमध्येही चर्चा सुरु झालीय.


अमोल भास्करचे उमा टॉकिज चौक तसेच ताराराणी चौकात फलक झळकले आहेत. बॅनरवर राजेश क्षीरसागर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांचाही फोटो आहे. 


दरम्यान, झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. चर्चा सुरु झाल्यानंतर गुंड अमोल भास्कर याचे मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले शहरातील होर्डिंग हटवण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या उपस्थितीत कोल्हापूर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे.