Kolhapur News: बिहारमध्ये (Bihar) मुस्लीम समाजातील (Muslim Community) 63 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर (Kolhapur) पोलिसांनी पडकला आहे. ट्रकमध्ये 7 ते 14 वयोगटातील 63 मुलं होती. ही सर्व मुस्लीम समाजातील मुलं आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेवून झडती घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही सर्व मुलं बिहारमधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथल्या एका मदरशात शिक्षणासाठी आणण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे. ही सर्व मुलं कोल्हापुरात रेल्वेने दाखल झाली, त्यानंतर एका ट्रकमधून आजाऱ्याला जाणार होती. पण हिंदुत्ववादी संघटनानी संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतलं आहे. कोल्हापुरात ही मुलं नेमकी का आली होती? त्यांना जबरदस्ती आणण्यात आलं होतं का? त्यांना ट्रकमध्ये कोंबून का नेलं जात होतं? असे अनेक प्रश्न हिंदुत्तवादी संघटनेने उपस्थित केले असून पोलिसांनी त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. 


दरम्यान, पोलिसांनी ट्रक थांबवत सर्व मुलांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस त्यांच्याकडे चौकशी करत खरंच मदरशात शिक्षणासाठी त्यांना नेलं जात होतं की अन्य काही कारण आहे याच तपास करत आहेत. 


त्र्यंबकेश्वरमध्ये आखाडा परिषदेच्या महामंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक


त्र्यंबकेश्वर मंदिरातील संदल मिरवणुकीच्या धूप प्रकरणी आता आखाडा परिषद सक्रिय झाली आहे. वाढणाऱ्या वादामुळे त्र्यंबकेश्वर नगरीची प्रतिमा मलिन होत असल्याने आखाडा परिषदेने साधू, महंत, पुरोहित, स्थानिक नेते आणि इतर सर्व मान्यवरांची बैठक आमंत्रित केली आहे. नील पर्वतावर ही बैठक होणार आहे  त्यानंतर मुस्लिम धर्मियांची संदल मिरवणूक त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर येऊन धूपदान करण्याची परंपरा आहे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. आखाडा परिषदेचे महामंत्री हरी गिरी महाराजांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.


वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, संजय राऊतांकडून टीका 


"महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
मला काही कट दिसत आहे. आमचे हिंदुत्व कडवट, नकली हिंदुत्व नाही. 
आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर श्रद्धास्थान असून माझ्या माहितीप्रमाणे तिथं कुणी घुसलं नाही. मुस्लिम लोक संदलच्या दरम्यान तिथं पायरीवर धूप दाखवतात, आरती करतात. मुस्लीम दर्ग्यावर हिंदू लोकही जातात. हाजी अली, अजमेर अशा ठिकाणी हिंदू लोक जातात," असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


"रामनवमीला कधी दंगल झाली नव्हती, सरकारच्या पायाखालची जमीन हादरली. महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे, पण सत्ताधारी सामाजिक सलोखा बिघडवत आहे," असा आरोप त्यांनी केला आहे.